Home धर्म-समाज मासिक पाळीच्या काळात स्वयंपाक करणारी पुढच्या जन्मी कुत्री तर जेवणारा बैल होतो...

मासिक पाळीच्या काळात स्वयंपाक करणारी पुढच्या जन्मी कुत्री तर जेवणारा बैल होतो : स्वामी कृष्णस्वरुप दास


swami krushna swarup das
 

राजकोट (वृत्तसंस्था) एखादी महिलेने मासिक पाळीच्या काळात स्वयंपाक तर ती पुढच्या जन्मी कुत्री होईल. तसेच अशा महिलांच्या हातचे अन्न खाणारी व्यक्ती पुढच्या जन्मात बैल होईल, अशी मुक्ताफळं गुजरातच्या भुज इथल्या स्वामीनारायण मंदिराच्या स्वामी कृष्णस्वरुप दासजी यांनी उधळली आहेत.

 

काही दिवसांपूर्वी गुजरातमधील शाळेत मुलींना मासिक पाळी आली की नाही हे चेक करण्यासाठी कपडे उतरवल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. त्यानंतर गुजरातच्या भुज इथल्या स्वामीनारायण मंदिराच्या स्वामी कृष्णस्वरुप दासजी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. स्वामी कृष्णस्वरुप दासजी स्वामीनारायण हे भुज मंदिरात उपदेशक आहेत. त्यांनी एका उपदेशात सांगितले की, मासिक पाळीच्या काळात महिलेने अन्न शिजवले आणि ते एखाद्याने खाल्ले तर त्याचा पुढचा जन्म बैल म्हणून होईल. पुरुषांनी असे अन्न खाल्ले तर त्यासाठी ते स्वत: दोषी असतील. याआधी भुजमध्ये एका महिला महाविद्यालयात मासिक पाळीवरून विद्यार्थीनींशी गैरवर्तन केल्याचे प्रकरण समोर आले होते. यानंतर आता कृष्णस्वरुप दासजी यांच्या व्हिडिओने खळबळ उडाली आहे.


Protected Content

Play sound