यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मालोद येथील अंगणवाडी शाळेतून अज्ञात चोरट्यांनी स्वयंपाक करण्याचे दोन गॅसचे कनेक्शन चोरून नेल्याचा प्रकार गुरूवारी उघडकीला आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील मालोद जामन्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत अंगवाणी क्रमांक १ व २ येथे शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाकासाठी दोन गॅस कनेक्शन ठेवण्यात आले आहे. सध्या शाळा बंद असल्यामुळे दररोज या ठिकाणी अंगणवाडी सेवीका येत असतांना. १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता शाळेच्या खोल्यांना कुलूप लावून घरी निघून गेल्या. अंगणवाडी शाळेच्या खोलीत ८ हजार रूपये किंमतीच्या दोन गॅस कनेक्शन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले, हा प्रकार गुरूवार १७ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीला आहे. अंगणवाडी सेविका जरीना तडवी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पाचपोळ करीत आहे.