मालेगाव (वृत्तसंस्था) गेल्या २४ तासांत मालेगाव तालुक्यात कोरोनाचे ४८ नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहेत. संपूर्ण शहराला आता सुपर रेड झोनमध्ये टाकण्यात आले आहे.
मालेगावात आता मेडिकल आणि रुग्णालये वगळता सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. नवीन रुग्णांमध्ये २ पोलिसांचा समावेश आहे. मालेगावात आतापर्यंत १९३ लोकांना कोरोना झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मालेगावातील ७ जण कोरोनामुक्त झाले होते. त्यामुळे मालेगावात नागरिकांच्या चिंता काहीशी कमी झाली होती. पण त्यानंतर पुन्हा नवे रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाला धक्का बसला आहे. मालेगाव शहरातील एकूण 14 परिसर कंटेन्मेंटझोन म्हणून घोषित करण्यात आले होते. परंतू आता संपूर्ण शहराला सुपर रेड झोनमध्ये टाकण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.