पाचोरा, प्रतिनिधी ! मालवाहु टेम्पोने एका पादचारी ४५ वर्षीय इसमास जोरदार धडक दिल्याने पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला . पोलिस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने टेम्पो चालकास ताब्यात घेण्यात आले त्याचे विरुद्ध पाचोरा पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पो हे कॉ प्रताप पाटील (रा. देशमुखवाडा, भडगाव) हे चाळीसगाव येथे नेमणुकीस आहेत . आज रजा असल्याने ते त्यांचे मित्र सुनिल देशमुख यांचे सोबत सकाळी प्रकाश भोई यास विघ्नहर्ता हॉस्पिटल येथे भेटण्यासाठी कार (क्रं. एम.एच. -१९ – सी व्ही – ७५५५) ने पाचोरा येथे आले.कारने परत भडगावकडे जात असतांना अंतुर्ली फाट्याजवळ मालवाहू टेम्पो (क्रं. एम. एच. – ११ – ए. एल. ५१२६) वरील चालकाने सकाळी ११ वाजेच्या सुमारास एका ४५ वर्षीय पादचाऱ्यास जोरदार धडक दिली. या धडकेत अनोळखी पादचाऱ्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. प्रताप पाटील यांच्या सतर्कतेने टेम्पो चालकास टेम्पो सहीत ताब्यात घेत प्रताप पाटील यांनी पाचोरा पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली
पाचोरा पोलिसात टेम्पोचालक संदीप पालवे (रा. मिसाळवाडी, कोल्हार,जि. अहमदनगर) विरुद्ध कलम २७९, ३०४ (अ),१८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे कॉ हंसराज मोरे करीत आहेत. मयत अनोखी पादचाऱ्याची ओळख पटविण्याचे आवाहन हंसराज मोरे यांनी केले आहे.