मालमत्ता कराचा आगाऊ भरणा करणाऱ्यांना सूट घेण्यास मुदत वाढ

जळगाव.लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महापालिकेच्या वतीने मालमता कारचा चालू वर्षाचा आगाऊ भरणा ३० एप्रिल पर्यत केल्यास १० टक्के सूट देण्यात येत असते. मात्र, यावर्षी महापौर जयश्री महाजन यांनी या मुदतीत वाढ करण्याची मागणी मनपा प्रशासनकडे केली होती. याला यश येवून ३१ मे पर्यंत भरणा करणाऱ्यांना या सूटचा लाभ घेता येणार आहे.

 

जळगाव शहरवासियांना यंदा नवीन घरपट्टी देण्यात आली असून जुन्या घरपट्टीच्या तुलनेत त्यात मोठा फरक पडला आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस दरवर्षी जळगावकर मालमत्ता मालकांना कर आकारणी पत्रक देण्यात येत असते. यानुसार मनपाने करपत्रक दिले असून त्यावर आकर्षक सवलत देखील दिली आहे. ३० एप्रिलपर्यंत मालमत्ता कराचा आगाऊ भरणा केल्यास नागरिकांना १० टक्के करात सूट मिळणार होती. ही मुदत संपल्याने नागरिकांचा हिरमोड झाला होता. नागरिकांनी महापौर जयश्री महाजन यांच्याकडे मुदत वाढी संदर्भात मागणी केली होती. महापौरांनी यासंदर्भात प्रशासनास सूचना दिल्या होत्या. त्यानुसार १० टक्के सूट लाभ ३० मेपर्यंत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content