औरंगाबाद प्रतिनिधी । गावी जाण्यासाठी पायी निघालेल्या व विश्रांतीसाठी रूळांवर झोपलेल्या १४ मजुरांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज पहाटे घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जालन्यातील एका स्टील कंपनीत काम करणारे १९ मजूर गावी जाण्यासाठी पायी औरंगाबादकडे निघाले होते. औरंगाबाद येथून गावी जाण्यासाठी रेल्वे पकडणार होते. जालना ते औरंगाबाद रेल्वे रूळाहून पायी जाताना रात्री ते सर्वजण रुळावर झोपले होते. सर्वजण झोपेत असतानाच मालगाडी वरून गेल्यामुळे १४ जणांचा चिरडून मृत्यू झाला. तर पाच मजूर गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बदनापूर ते करमाड रेल्वे स्थानकांच्या दरम्यान झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यात जखमी झालेल्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आज सकाळीच रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००