धरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील एका गावात असलेल्या ५५ वर्षीय महिलेला गाडी पार्कींग लावण्याच्या कारणावरून डॉक्टरने अश्लिल शिवीगाळ करून विनयभंग केला तर कुटुंबाला जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील एका गावातील एका भागात (वय-५५) वर्षीय महिला या आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २५ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास डॉक्टर उत्पल कुंवर पाटील याने त्याची दुचाकी वाळूजवळ लावली. त्यावर महिलेने दुचाकी वाळूवर लावू नका असे बोलल्याच्या राग आल्याने डॉक्टरने महिलेला अश्लिल शिवीगाळ करून कानशिलात लगावली. त्यानंतर महिला ही पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास जात असतांना तिचा रस्ता आडवून तिच्या अंगावरील साडी ओडून विनयभंग केला. आणि कुटुंबाला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. दरम्यान तीन ते चार दिवस महिलेने पोलीसात कुठलीही तक्रार दिली नाही, परंतु अखेर मोठ्या हिंमतीने मंगळवारी ३० मे रोजी रात्री ९ वाजता महिलेने धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. महिलेच्या तक्रारीवरून डॉक्टर उत्पल कुवर पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोर करीत आहे.