जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी रविवारी मनपा अधिकाऱ्यांसोबत शाहू नगर परिसरात गटारी व भिलपुरा रस्ता ते ममुराबाद रोड पुलाची व आसोदा रोड पुलाची मान्सूनपूर्व पाहणी करून नालेसफाई करण्यासंदर्भात सूचना दिल्यात.
आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी शहर अभियंता नरेंद्र जावळे यांच्या समवेत व आरोग्य निरीक्षक श्री. लोखंडे तसेच प्रभाग समिती क्रमांक २ सभापती यांचे समवेत भिलपुरा रस्ता ते मुमराबाद रोड पुलाची व आसोदा रोड पुलाची मान्सून पूर्व पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित विभाग प्रमुख तसेच शहर अभियंता यांना मान्सून पूर्व नाले साफ सफाई करण्यासंदर्भात तसेच याव्यतिरिक्त विशेष सूचना त्यांना देण्यात आल्यात. तसेच आयुक्त डॉ. गायकवाड यांनी शाहूनगर, दत्त कॉलनी ,भोईटे नगर गेट समोरील रस्त्यांची व गटार व्यवस्थेची अचानक भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी रस्ते, गटार , नाली साफसफाई करणे संदर्भात तसेच परिसरातील कचरा घंटागाडीतच संकलन करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना आरोग्य विभागास विशेषतः सीएसआय यांना आल्यात. यासोबतच त्यांनी दत्त कॉलनी परिसरात सुरु असलेल्या रस्ते डांबरीकरणाच्या कामाची अचानक भेट देऊन पाहणी केली.