मानेवर चाकू लावून वृध्दाला लुटणारे दोघे जेरबंद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुलीला भेटण्यासाठी नाशिकहुन जळगावला आलेल्या ७८ वर्षीय वृध्दाला लुटणाऱ्या दोन संशयित आरोपींना एमआयडीसी पोलीसांनी जेरबंद केले आहे. अटकेतील दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

आकाश उर्फ चोक्या अरुण जोशी आणि लक्ष्मण उर्फ चिंट्या खेमचंद जोशी दोघे रा. जोशी कॉलनी, जळगाव असे अटकेतील संशयितांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तमराव नामदेव वाघ (वय-७८) रा. द्वारका, नाशिक हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते  रेल्वे विभागात सिनीयर सेक्शन इंजीनीयर या पदावरून सेवानिवृत्त आहेत. त्यांची लहान मुलगी जळगावातील संत गाडगेबाबा चौकात राहत असल्याने त्यांना भेटण्यासाठी उत्तमराव वाघ हे शुक्रवारी २९ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता जळगावात रेल्वेने आले. मुलीच्या घरी जाण्यासाठी ते रिक्षाने बसले. रिक्षात आगोदर दोन जण बसले होते. रिक्षा इच्छादेवी चौक, डी-मार्ट पाईंटवरून संत गाडगेबाबा चौक न जात थेट मेहरूण तलावाजवळील एका गल्लीतील अंधारात घेवून गेला. त्यावेळी तिन जणांनी अचानक उत्तमराव वाघ यांच्या मानेला चाकू लावून खिश्यातील ४ हजाराची रोकड आणि १२ हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावून पसार झाले. याबाबत एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या गोपनिय माहितीनुसार, पोलीस कर्मचाऱ्यांनी आकाश उर्फ चोक्या अरुण जोशी आणि लक्ष्मण उर्फ चिंट्या खेमचंद जोशी दोघे रा. जोशी कॉलनी, जळगाव दोघांना आठवडे बाजारातून रविवारी ३१ जुलै रोजी दुपारी अटक केली आहे.

 

यांनी केली कारवाई

पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, सुधीर साळवे, इमरान सय्यद, किशोर पाटील, मुदस्सर काझी, छगन तायडे, सचिन पाटील यांनी कारवाई केली.

Protected Content