मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेरून पिस्तुल आणि ७ जिवंत काडतूसासह एका अट्टल दरोडेखोराला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. इर्शाद खान असे या दरोडेखोराचे नाव आहे.
मातोश्रीजवळील हायवेवर खेरवाडी जंक्शन परिसरातून आरोपीला अटक करण्यात आली. मातोश्रीपासूनच काही अंतरावर त्याला अटक करण्यात आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांना खबऱ्याकडून संबंधित आरोपी शस्त्रविक्रीसाठी या परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. यात आरोपीकडे एक गावठी बनावटीचा पिस्तूल आणि ७ जिवंत काडतूस मिळाली. इर्शाद खान याठिकाणी कुठे दरोडा टाकण्यासाठी आला होता. त्याने स्वत: जवळ बंदूक का बाळगली होती, याची चौकशी पोलीस करत आहेत.