जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र जन क्रांती मोर्चा यांचे विद्यमाने आज त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांचे जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी महाराष्ट्र जन क्रांती मोर्चा प्रदेश अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांचे हस्ते माता रमाई आंबेडकर यांचे प्रतीमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
मुकुंद सपकाळे यांनी मनोगत व्यक्त केले.माता रमाई आंबेडकर यांचे कष्ट ,परिश्रम, संयम, त्याग व समर्पण वृत्ती याबाबत प्रासंगिक उदाहरणे देवून माता रमाई आंबेडकर यांचे कार्य स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण, समाज कार्य, राष्ट्र सेवा व कार्य याकामी माता रमाई आंबेडकर यांनी मोठे योगदान दिले आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्री चे योगदान असते. माता रमाई आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अखेपर्यंत मोलाची साथ दिलेली आहे. माता रमाई म्हणजे प्रज्ञा सूर्याची सावली होती. त्याग व समर्पणाचे दुसरे नाव म्हणजे माता रमाई आंबेडकर होय असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे यांनी केले. आभार रमेश सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमप्रसंगी दिलीप सपकाळे, चंदन बिऱ्हाडे, छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष अमोल कोल्हे, मोती बापू पाटील, सुकदेव नाथ बाबा, संजय सपकाळे, श्रीकांत मोरे, भारत सोनवणे, डीगंबर सोनवणे, राही खैरनार, किरण ठाकूर, आकाश सपकाळे आदी मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.