मातब्बर अशोक औटे यांचा गोंदेगाव सोसायटी निवडणुकीत नवख्या तरुणाने केला पराभव

शेंदुर्णी-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनीधी | येथून जवळच असलेल्या गोंदेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत सहकार बचाव पॅनलने एकतर्फी विजय मिळविला तर शेतकरी पॅनलचा दारुण पराभव झाला आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरूड, प्रदीप लोढा,माजी पं.स.सभापती किशोर पाटील यांच्या सहकार बचाव पॅनलने दणदणीत विजय संपादित केला आहे. तर आमदार गिरीश महाजन,मनसेचे डॉ. विजयानंद कुलकर्णी, सहकार तज्ञ अशोक औटे यांच्या शेतकरी पॅनलचा दारुण पराभव झाला आहे.या निवडणुकीत ३५ वर्षांपासून सहकारात तज्ञ म्हणून परिचित असलेले जामनेर तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक अशोक बाजीराव औटे यांचा इतर मागासवर्ग मतदार संघात २४ वर्षीय निलेश कैलास खाकरे या नवख्या उमेदवाराने ५७ मतांनी पराभव केला. महीला राखीव मतदार संघ कल्पना पंढरी डीगावकर (१६७), सुमनबाई रामा खाकरे (१५६), इतर मागासवर्ग मतदार संघ निलेश कैलास खाकरे (१८०), अनु सूचित जाती जमाती मतदार संघ शब्बीर खा मानखा तडवी (१७८), सर्व साधारण मतदार संघात नानासाहेब मानसिंग पाटील (१६९) , ओंकार सोनू सुलताने (१६७), भागवत बाबुराव पाटील (१६५), आत्माराम भागाजी शेवतकर (१५९), दादा काशिनाथ देवरे (१५६), संदीप शांताराम गव्हाड (१५४), नामदेव रामकृष्णा पवार(१५३), वामन विठ्ठल खाकरे (१४७), हे सहकार बचाव पॅनल चे उमेदवार निवडूण आले तर हरदास भागू चव्हाण हे आधीच बिनविरोध निवडून आले आहेत विजयी उमेदवारांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Protected Content