माणुसकी मल्टिपर्पजच्या महिला तालुकाध्यक्षपदी चेतना हिरे यांची नियुक्ती

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील कु. चेतना रणदीप हिरे हिची माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशन महाराष्ट्र राज्यच्या पाचोरा तालुका महिला अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली.

 

माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष विवेक राजापुरे यांनी चेतना रणदीप हिरे यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे. माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या फाउंडेशन च्या माध्यमातून आरोग्य महिला सक्षमीकरण, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरण,सामाजिक विकासात्मक व देशसेवेच्या कार्यात नेहमी अग्रेसर राहील आणि नक्कीच मी माझी जबाबदारी योग्य रित्या पार पाडेल असे मत चेतना हिरे यांनी व्यक्त केले. चेतना हिरे हिच्या नियुक्तीबद्दल तिचे सर्वच स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

Protected Content