माझ्या पाठपुराव्यानंतर जलजीवन मिशनअंतर्गत योजनेस मंजुरी – आमदार लताताई सोनवणे

 

यावल, प्रतिनिधी । येथील तालुक्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या गावातील १७ गावातील मंजुर झालेल्या जलजिवन मिशन अंतर्गत कामाचा पाठपुरवठा केल्याचा दावा चोपडा मतदारसंघातील शिवसेनेच्या आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी केला आहे. तसेच जिल्हा परिषदेचे काही पदाधिकारी या कामांचा श्रेय घेण्याच्या प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी पत्रकारांशी बोलतांना केला.

चोपडा विधान सभा क्षेत्राच्या आमदार लता सोनवणे यांनी त्यांच्या सातत्याने केलेल्या प्रयत्नांतून जलजीवन मिशन या योजनेअंतर्गत यावल तालुक्यातील पिळोदेखुर्द, थोरगव्हाण, डांभुर्णी, ईचखेडा, चिंचोली , दहिगाव, साकळी, शिरसाड, मनवेल, वाघोदे, गिरडगाव, शिरागड, नायगाव, वाघझीरा, डोणगाव, उंटावद, कोरपावली या चोपडा विधानसभा मतदारसंघातील १७ गावांना मंजुर झालेल्या सुमारे अडीच कोटी रूपयांच्या पाणीपुरवठा योजनेकरीता आपण सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर या कामांना मंजुरी मिळाली असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदचे काही पदाधिकारी आम्ही या योजना मंजुर करून आणल्याचे सांगत असुन त्यांनी याबाबतचे पुरावे सादर करावे असे आव्हान आमदार लताताई सोनवणे यांनी दिले आहे . दरम्यान या श्रेयवादावरून तालुक्यात राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगु लागल्याचे दिसून येत आहे.

Protected Content