जळगाव, प्रतिनिधी | आरपीआय व माझा काडीमात्रही संबध नसतांना अनिल अडकमोल पक्षाच्या पदाचा दुरुपयोग करत आहेत. अनिल अडकमोल हे रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष असून हे उपोषण वाळू माफिया, रेशन दुकानदारांकडून पैसे घेऊन प्रायोजित असल्याचा आरोप दीपककुमार गुप्ता यांनी केला आहे.
माझ्या पोलीस प्रोटेक्शनला जवळपास २ वर्ष पूर्ण होत असताना आजपर्यंत ती काढण्याची कोणीही मागणी केलेली नाही. काल मी जोड रेशन दुकाने अलग अलग करण्याची मागणी केली आहे. त्यात अनिल अडकमोल यांच्यादेखील दोन दुकानांचा समावेश असल्याने त्यांनी माझ्या विरोधात आंदोलन पुकारले आहे. माझ्यावर हल्ला करण्यासाठीच सुरक्षा काढण्याची मागणी करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्यावर हल्ला झाला तर यास सर्वश्री अनिल अडकमोल जबाबदार राहीतील असा इशारा श्री. गुप्ता यांनी दिला. अंत्योदय व प्रधानमंत्री अन्न मोफत योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला १५-२० कोटींचे अन्नधान्य येत असते. यातील अर्ध्याहून अधिक अन्नधान्याचा भ्रष्टाचार हे दोषी रेशन दुकानदार करत असतात. याची पुराव्यानिशी तक्रार दिल्याने त्यांची चौकशी सुरु झाली आहे. मी याबाबत हायकोर्टात जाणार असल्याने पालकमंत्री व प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या तक्रारीनंतर १४० रेशन दुकानदारांना जिल्हाधिकारी यांनी दंड केला आहे. या सर्व दोषी रेशन दुकानदारांचे रेशन परवाने रद्द करा नवीन लोकांना संधी दिली पाहिजे अशी अपेक्षा श्री. गुप्ता यांनी व्यक्त केली आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1281829705654716