मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । कायम चर्चेत राहणारे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझ्याच पक्षातील नेते माझ्याविरोधात कट रचत असल्याचा गंभीर आरोप सत्तार यांनी केला आहे.
सिल्लोड येथील कृषिमहोत्सव, टीईटी घोटाळा, वाशीम येथील गायरान जमीनीवरून मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मोठ्या प्रमाणावर आरोप होत आहे. यासंदर्भात मंत्री अब्दुल सत्तार यांनी मौन सोडले. त्यानी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, मला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे.
यात विरोधकांसह माझ्याच पक्षातील काही नेते माझ्याविरोधात कट रचत आहे. ज्यांच्या मंत्रीपद मिळालं नाही यांच्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरात होणारी चर्चा बाहेर येत आहे. त्यामुळे आमच्यातील कोणीतरी बाहेर बातम्या पुरविण्याचे काम करत आहे. असा आरोप सत्तार यांनी केला.