माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत सरसकट तपासणी करा — बिडिओ दिपाली कोतवाल

 

 

रावेर  : प्रतिनिधी । माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत  तालुक्यात घरोघरी जाऊन सर्वांची सरसकट कोरोना तपासणी करा असे निर्देश बिडिओ दिपाली कोतवाल  यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना दिले आहेत

 

तालुक्यात ग्रामीण भागात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत २५४  पथके  तयार करण्यात  आली आहेत ती उद्या पासुन प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन कुटुंबातील सर्वांची तपासणी करणार आहेत . यासाठी नागरीकांनी सहकार्य करण्याचे अवाहन गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी ग्रामीण भागातील जनतेला केले आहे.

 

ग्रामीण भागात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी पंचायत समिती  पुन्हा  माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत रुग्णाचा शोध घेणार आहे.

 

दरम्यान ग्रामीण भागात कोरोना रुग्ण शोधण्यासाठी २५४ पथके काम करणार आहेत त्यात  एक सुपरव्हिजन तर तीन कर्मचारी प्रत्येक पथकामध्ये असणार आहे.ही शोध मोहीम २८ एप्रिल ते २ मे पर्यंत राबविली जाणार आहे.

 

माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियाना अंतर्गत सर्वेक्षणात गावातील एकही घर सुटणार नाही याची काळजी घेण्याचे सूचित करण्यात आले आहे.हे सर्वेक्षण सकाळी आठ ते दुपारी अकरा या वेळेत करण्यात येणार आहे. सर्वेक्षणाचे रिपोटिंग त्याच दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रला करणे बंधनकारक आहे.कर्तव्यात टाळाटाळ करणाऱ्या व कामकाजात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा आदेश गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी काढला आहे.

Protected Content