माजी सरपंचांनी भिल्ल वस्तीतील साजरी केली दिवाळी

जामनेर प्रतिनिधी | समाजातील आर्थिक दुर्बल गरीब आणि वंचितांना दिवाळी सणाचा आनंद घेता यावा या उद्देशाने सालाबादप्रमाणे यावर्षी ही स्वराज्य गृपचे संस्थापक तथा माजी सरपंच कमलाकर पाटील यांनी दिपावली सणाचे औचित्य साधुन आदिवासी भिल सामाजाच्या लोक वस्तीत जाऊन अनोख्या पध्दतीने दिवाळी साजरी केली.

 

 

वस्तीत महिलांना फराळाचे,मिठाई तसेच संसार उपयोगी साहित्य भेटवस्तु वाटप करुन त्यांच्या जीवनामध्ये आनंद फुलवला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद यावेळी दिसत होता. बच्चे कंपनीचा उत्साह ओसंडून वाहत होता. यावेळी महिला भगिनींनि औक्षण केले. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोचि साधू ओळखावा या उक्तीप्रमाणे आदिवासी भिल्ल बांधवाच्या जीवनात आनंद फुलवण्याचे काम केले. पाटील परिवाराकडुन हा उपक्रम राबवून सामाजिक बांधीकीचा संदेश दिला आहे.

 

यावेळी पाळधी गावचे व सध्या नाशिक येथे स्थायिक असलेले उद्योगपती गबा हाजी शेठ, सरपंच प्रशांत बाविस्कर, माजी सरपंच कमलाकर पाटील, सोपान सोनवणे, ग्रा.पं. सदस्य मनोज नेवे, संदीप सुशिर, देवचंद परदेशी, विनोद पाटील, परफेक्ट टेलर, संजय शेळके,विनोद कोळी, गणेश पाटील ,रामा लोहार, जयवंत माळी, योगेश करवंदे, पिंटू भिल्ल, नवल जाधव ,संजय जाधव, निखिल पाटील, पवन लोहार, किशोर वाघ, रवी करवंदे, अभिषेक पाटील, आकाश पाटील, व महिला भगिनी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Protected Content