Home राजकीय माजी विधानसभाध्यक्ष शिवाजीराव देशमुख कालवश

माजी विधानसभाध्यक्ष शिवाजीराव देशमुख कालवश

0
43

मुंबई प्रतिनिधी । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव देशमुख (वय८४) यांचे आज उपचार सुरू असतांना निधन झाले.

शिवाजीराव देशमुख यांचा १ सप्टेंबर १९३५मध्ये जन्म झाला होता. १९९६ ते २००२ या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापतीपद भूषवलं होते. १९७८, १९८०, १९८५ आणि १९९०मध्ये ते विधानसभेवर निवडून गेले होते. गत काही दिवसांपासून त्यांना बॉम्बे रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज सायंकाळी त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. देशमुख यांचे पार्थिव मंगळवारी दुपारी मूळ गावी कोकरुड (ता. शिराळा) येथे आणण्यात येणार येणार आहे. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. देशमुख यांच्या पश्‍चात पत्नी सरोजनी, पुत्र काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख, मुलगी डॉ. शिल्पा, भाऊ फत्तेसिंगराव, सून रेणुका, जावई डॉ. मनोज असा परिवार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound