माजी मुख्यमंत्री कन्नमवार यांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ आंदोलन (व्हिडीओ)

मुक्ताईनगर प्रतिनिधी । राज्याचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमराव यांचे सभागृहाला असलेले नाव काढून आवमान केल्याच्या निषेधार्थ भारतीय आदिवासी भटके विमुक्त यूथ फ्रंटच्यावतीने आज मुक्ताईनगर तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले आहे.

भारतीय आदिवासी भटके विमुक्त युथ फ्रंटचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य बेलदार समाज महासंघटनेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते जानकिराम पांडे यांचे नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे.

चंद्रपुर जिल्ह्यातील मौजा बोर्डा दिक्षित ता. पोंभूर्णी येथील सामाजिक सभागृहाचे नाव माजी मुख्यमंत्री स्व. मारोतराव कन्नमवार यांचे नाव देण्यासाठी ठराव देखील २५ नोव्हेबर २०१९ रोजी करण्यात आला होता. १० जानेवारी २०२१ रोजी कर्मवीर मारोतराव कन्नमवार यांच्या १२१ व्या जयंतीमित्त सदर नाव सभागृहाला देण्यात आले होते. मात्र हे नाव काही विक्रृत समजा कंटकांकडून पुसण्यात आले. माजी मुख्यमंत्री कन्नमवार हे राज्यातील दुसरे तर भटक्या विमुक्त जमातीचे प्रथम मुख्यमंत्री आहेत. वळ जातीय द्वेषापोटी काही जातीयवादी समाजकंटकांनी सदरचे नाव पुसून पुरोगामी महाराष्टाला कलंक लावलेला आहे.झालेल्या प्रकारामुळे समाजाच्या अस्मितेला धक्का बसला आहे.माजी मुख्यमंत्री हे भटक्या जमातीच्या बेलदार समाजातील असल्याने संपूर्ण बेलदार समाज व भटक्या जमतींसाठी कन्नमवार हे भुषण असल्याने हा संपूर्ण आदिवासी भटक्या जमातींच्या इब्रातीचा व अस्मिततेचा अपमान करण्यात आला आहे. अशा समाज कंटकांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी, यासाठी सहकार्य करणाऱ्या पोलीस निरीक्षकांची निलंबनाची कारवाई करावी यासाठी भारतीय आदिवासी भटके विमुक्त युथ फ्रंट तथा महाराष्ट्र राज्य बेलदार समाज महासंघटने तर्फे मुक्ताईनगर तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.

ज्य सरकारने व जिल्हा प्रशासनाने या संदर्भात तत्काळ कारवाई न केल्यास भारतीय आदिवासी भटके विमुक्त युथ फ्रंट तथा महाराष्ट्र राज्य बेलदार समाज महासंघटने तर्फे राज्यभरातून भटके विमुक्त, ओबीसी बांधव, बेलदार समाज रस्त्यावर उतरून राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला असून याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची राहील असे निवेदनात नमूद केले आहे. सामाजिक कार्यकर्ते जानकिराम पांडे यांचे नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

https://www.facebook.com/508992935887325/videos/118563863482740

Protected Content