पाचोरा, प्रतिनिधी ! आज दुपारी १२ वाजता पाचोरा – भडगाव मतदार संघाचे माजी आ. दिलीप वाघ यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र वरखेडी ता. पाचोरा येथे जाऊन नियमाप्रमाणे नावनोंदणी करून कोरोना लस घेतली. तसेच सर्व पात्र नागरिकांनी लस घ्यावी, लसीचे काहीही दुष्परिणाम नसून आपल्या हिताचीच असल्याचे त्यांनी यावेळी प्रतिपादन केले.
यावेळी वरखेडी पी. एच. सी. चे मेडिकल ऑफिसर डॉ. शेखर पाटील व त्यांच्या सर्व कर्मचारी वर्गाच उत्कृष्ट कामकाजाबद्दल अभिनंदन केले. यावेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष शालिग्राम मालकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक रणजित पाटील, जिल्हा प्रवक्ता खलील देशमुख, वरखेडीचे माजी सरपंच व विद्यमान ग्रां. प. सदस्य डिंगबर पाटील, भोजे येथील शितल पाटील, बंडू पाटील, सावखेड्याचे माजी सरपंच जयसिंग परदेशी (कारभारी), रशीद हाजी उर्खडू , माजी पं. स. सदस्य डॉ. अल्ताप शफी, माजी सरपंच, ग्राम पंचायत सदस्य अलीम रुस्तम, आसिफ इस्माईल, पत्रकार दिलीप जैन, पत्रकार रवी शंकर पांडे, डॉ. मयुर पाटील, डॉ. दिपाली सोनवणे, औषध निर्माण अधिकारी साळुंखे, आरोग्य सहाय्यक चौधरी, आरोग्य सेविका श्रीमती चव्हाण, आरोग्य सेविका ए. सी. पाटील, आरोग्य सेवक योगेश पाटील व राजेंद्र भिवसने प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री. देशमुख, दिनेश चौधरी, शिपाई गौरव जाधव, वाहन चालक, सफाई कामगार, श्रीमती खंडारे व आशा स्वयंसेविका यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते. दिलीप वाघ यांनी सर्वसामान्यांनप्रमाणे रितसर नंबर लावून लस घेतल्याने सर्वच स्तरातून दिलीप वाघ यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून जनसामान्यांचे असामान्य नैतृत्व दिलीप वाघ हेच असल्याचं त्यांच्या कृतीतून दिसून आले.