Home क्राईम माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल


औरंगाबाद (वृत्तसंस्था) एका व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. जाधव यांनी नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पुन्हा प्रवेश केलाय.

 

पीडित व्यक्तीची हर्षवर्धन जाधव यांच्या जमिनीच्या प्लॉट शेजारी टपरी होती. ती टपरी काढण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी जातीवाचक शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप पीडित व्यक्तीने केला आहे. त्याने याविरोधात पोलिसांकडे लेखी तक्रार देत जाधव यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. अखेर पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला.

 


Protected Content

Play sound