माजी आमदार सुरेश गोरे यांचे निधन

 

पुणेः वृत्तसंस्था । खेड तालुक्याचे माजी आमदार सुरेश नामदेव गोरे यांचे ( वय -५६ ) आज सकाळी रुबी हॉस्पीटलमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. गेले एकवीस दिवस ते उपचार घेत होते.

कोरोनाच्या आजारातून बरे झाल्यावर ते फुफुसाच्या उदभवलेल्या आजाराच्या उपचाराला प्रतिसादही देते होते. मात्र आज सकाळी त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली

२०१४ ते २०१९ या कालावधीत ते शिवसेनेचे आमदार होते. आमदार होण्यापूर्वी ते सलग तीन वेळा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषदेवर निवडून आले होते. अडीच वर्ष त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भुषविले होते. सरळ आणि मितभाषी स्वभावामुळे ते प्रसिध्द होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी आणि भावंडांचे मोठे एकत्रित कुंटूब आहे.

Protected Content