नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मागील २४ तासांत देशात ५७ हजार ११७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर ७६४ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


देशात एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १६ लाख ९५ हजार ९८८ इतकी झाली आहे. भारतात सध्या पाच लाख ६५ हजार १०३ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दिलासादायक बाब म्हणजे १० लाख ९४ हजार ३७४ जणांनी करोनावर मात केली आहे. तर भारतात काल दिवसभरात ३६,५६८ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत १०,९४,३७४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात असून येथील रुग्णांचा एकूण आकडा ४ लाख २२ हजार ११८ वर पोहोचला आहे.


