एरंडोल प्रतिनिधी । येथे महादेव मंदीर विश्वस्त मंडळातर्फे आयोजित कुस्ती सामन्यात १लाख ६१हजार रूपये बक्षीसाची मानाची कुस्ती भारत केसरी माऊली जमदाडे याने जिंकली. त्याने मोहम्मद बोरानी ला आस्मान दाखवले.
सोमवारी एरंडोल येथे महादेव मंदीरा नजीक कुस्त्यांचे सामने आयोजित करण्यात आले लहान-मोठ्या ६०ते७०कुस्त्या झाल्या.भाजपाचे संघटनमंञी अॅड. किशोर काळकर यांच्या हस्ते आखाडा पुजन करण्यात आले.नगराध्यक्ष रमेश परदेशी यांचे हस्ते बजरंग बली च्या प्रतीमेची पुजा करण्यात आली. खासदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते मानाची कुस्ती लावण्यात आली.या प्रसंगी उपनगराध्यक्ष अॅड. नितीन महाजन, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, किशोर निंबाळकर, रविंद्र महाजन,रमेश महाजन,योगेश महाजन,जहीरोद्दीन शेख कासम,पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, शालिकभाऊ गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पांडुरंग महाले, गुलाब चौधरी, सतीष वाडकर धुळे, दिनेश गुजर यांनी पंच म्हणुन काम पाहीले.कुस्त्या पार पाडण्याकामी बबलु पाटील, संजय महाजन, सतीष परदेशी यांचेसह ईतर कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले. यावेळी पोलिस निरीक्षक स्वप्निल उनवणे व त्यांच्या सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. यावेळी धुळे, मालेगाव,दोंडाईचा,नंदुरबार व ईतर लांबच्या ठिकाणाहुन कुस्तीगीर आले होते.