Home क्राईम महिलेची साडी ओढून केला विनयभंग

महिलेची साडी ओढून केला विनयभंग

0
35

भडगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेची साडी ओढून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील एका गावात महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २२ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता गावातील बापू हिरामण पाटील हा महिलेच्या घरात घूसुन तिची साडी ओढली. महिलेला जवळ ओढून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी बापू पाटील याच्या विरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल पंचशिला निकम करीत आहे.


Protected Content

Play sound