जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मेहरून परिसरातील एका भागात राहणाऱ्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी रविवार १३ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी पोलिसात एकाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की मेहरून परिसरातील एका भागात 48 वर्षीय महिला वास्तव्यास आहे. याच परिसरात राहणार्या एकाने 13 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता महिलेला एका दुकानावर बोलवून तिच्याकडे शरीर सुखाचे मागणी केली. व महिलेचा विनयभंग केला. या प्रकाराबाबत महिलेने सायंकाळी पुणे सहा वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस तक्रार दिली त्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे हे करीत आहे