जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मालेगावहून जामनेर येथे आलेल्या महिला प्रवाश्याच्या पिशवीतून गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने सुमारे १ लाख ५ हजार रुपये किमतीचा सोन्याचे दागिने व महत्त्वाचे कागदपत्रे असा मुद्देमाल चोरून नेल्याचे घटना उघडकीला आली आहे. याबाबत मंगळवार १४ मार्च रोजी दुपारी १ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, साबेरा सांडू तडवी (वय-५८) रा. पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १३ मार्च रोजी त्या मालेगावहून जामनेर येथे बसने आले. दुपारी चार वाजता ते जामनेर बसस्थानकाता बसमधून खाली उतरत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या पिशवीतून १ लाख ५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व महत्त्वाचे कागदपत्रे चोरून नेले. हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी जामनेर बसस्थानक परिसरात सर्वत्र शोध घेतला. परंतु याची कोणतीही माहिती मिळून न आल्याने अखेर जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक राजू तायडे करीत आहे.