पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा पोलीस स्टेशन येथे जागतिक महिला दिनानिमित्त पारोळा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी महिला दक्षता कमिटी मेम्बर व महिला पोलीस पाटील यांना एक दिवसाकरिता नॉमिनल पोलीस स्टेशनचा चार्जे दिला.
सकाळी ८ वाजता पोलीस ठाण्यात बोलावून महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक पोलीस स्टेशनला सत्कार करण्यात आला व नाममात्र म्हणून पोलीस निरीक्षक म्हणून ऍड कृतिका आफ्रे, ठाणे अंमलदार नलिनी पाटील, सहाययक ठाणे अमलदार सुनंदा शेंडे, ज्योती पाटील, उषा पाटील, वायरलेस ड्युटी वैशाली पाटील, कारकून ललित पाटील, क्राईम मायाताई सरदार, सीमा पाटील, बारणीशी रुपाली पाटील, ज्योत्स्ना पाटील, पासपोर्ट शीतल पाटील, गायत्री पाटील, तामसवाडी बिट, शोभा पाटील, शीतल पाटील, बहादरपूर बिट जयश्री साळी, टाऊन बिट कल्पना पाटील, राजवड बिट सुरेख पाटील, डीबी पथक अन्नपूर्णा पाटील, पूजा पाटील, पूनम पाटील, सरोज परदेशी यांना वरील प्रमाणे कामाची महियी देऊन काम सोपवले आहे. पोलिसांनी समक्ष हजर राहून पोलिस दैनंदिन कसे कामकाज करतात. समजावून सांगून आलेल्या तक्रारदार यांचे निरसन महिला दक्षता कमिटी मेंबर व महिला पोलीस पाटील यांचे कडून कामकाज करून घेतले.
दहावी व बारावीची परीक्षा चालू असलेने NES शाळेचे बाहेरील बाजूस बंदोबस्त सुद्धा केला असून दैनंदिन पोलीस कसे ड्युटी करतात, हा अप्रतिम अनुभव सुद्धा त्यांनी घेतला असून महिलांचे घरगुती वाद व पती पत्नीचे वाद असे २ प्रकरण सुद्धा हाताळले असून दोन्ही प्रकरणात पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनात दोन संसार जुळविण्याचा प्रयत्न करून वाद मिटविला आहे.
पारोळा महिला दक्षता कमिटी व पारोळा महिला पोलीस पाटील यांनी एक दिवस पोलीस स्टेशनचे नाममात्र जागतिक महिला दीना निमित्त कामकाज पाहिलेने आयुष्यातील आगळावेगळा अनुभव आल्याची भावना व्यक्त केली असून,पोलीस स्टेशनला प्रत्येक आलेला तक्रारदार त्यांना आताचे आताच पोलिसांनी न्याय दिला पाहिजे या भावनेतून येतात त्यामुळे कायदेशीर कारवाई करून त्यांचे समाधान करण्यास पोलिसांना डोक्यावर बर्फाचा गोळा व तोंडात साखर ठेवूनच काम करावे लागते अशी एक दिवस कामकाज केलेले महिलांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत,व शेवटी पोलीसांचे आभार सुद्धा मानले आहे. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, पोलीस उपनिरीक्षक राजु जाधव, शेखर डोमाले,ASI इकबाल शेख,पो ना गजरे,पी कॉ मोहसीन ,पी कॉ पगारे यांनी सहकार्य केले आहे.