श्री. संत ज्ञानेश्वर विद्यालयात महिला दिनानिमित्त विद्यार्थिनींचा उत्साह

विद्यार्थिनींनी विविध वेशभूषा करीत महिलांच्या कर्तुत्वाची सांगितली महती

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थिनींनी विविध वेशभूषा करीत महिलांच्या कर्तुत्वाची महती सांगितली.

सुरुवातीला राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी माल्यार्पण केले. ज्येष्ठ उपशिक्षिका उज्वला नन्नवरे यांचेसह इतर शिक्षकांनी जागतिक महिला दिनाविषयी माहिती दिली. यानंतर विद्यार्थिनींनी विविध वेशभूषा केल्याप्रमाणे थोर महिलांची माहिती सांगितली. यात जिजामाता, सावित्रीमाई फुले यासह डॉक्टर, क्रिकेटपटू, वकील, आयएएस अधिकारी आदींची वेशभूषा विद्यार्थिनींनी केली होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा अंभोरे यांनी केले. कार्यक्रमाची संकल्पना संस्थेचे सचिव तथा उप शिक्षक मुकेश नाईक यांची होती. यावेळी विद्यालयातील मुख्याध्यापिका ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Protected Content