Home Cities जळगाव महिलांना ब्युटी पार्लरसाठी उपयुक्त कीटचे वाटप

महिलांना ब्युटी पार्लरसाठी उपयुक्त कीटचे वाटप

0
56

जळगाव प्रतिनिधी | पिंप्रळा  येथे  आत्मनिर्भर महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण अंतर्गत  महिलांना आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते  ब्युटी पार्लरसाठी उपयोगी असलेले कीटचे वाटप करण्यात आले.

 

रोहिणी ब्युटी पार्लर व  सायली कॉस्मेटिक यांच्या सौजन्याने २० महिलांना ब्युटी पार्लरसाठी उपयोगी असलेले कीटचे  वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हे कीट वाटप  वितरणप्रसंगी  आ. राजूमामा भोळे, नगरसेविका शोभा बारी, विजय पाटील, नीलू परदेशी, शक्ती महाजन, शुभांगी बिऱ्हाडे यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत रोशनी पाटील व प्राजक्ता वर यांनी केले आभार रोशनी यांनी मानले यशस्वीतेसाठी भाग्यश्री घोडके वृषाली साळवी साक्षी कोई दिव्या कुंभार पूजा महाजन रूपाली चव्हाण व रोहिणी ब्युटी पार्लर च्या संचालिका रोहिणी प्रसाद घायदार यांनी कामकाज पाहिले.


Protected Content

Play sound