पारोळा प्रतिनिधी। महिलांना केवळ ‘महिलादिनी’च सन्मानाची वागणूक न मिळता वर्षातील ३६५ दिवस अर्थात नेहमी, सन्मानासह समानतेची वागणूक मिळावी अशी अपेक्षा तालूका आरोग्यधिकारी डाँ.प्रांजली पाटील यांनी व्यक्त केली.
मनन बहुउद्देशीय संस्था आणि श्री स्वामी समर्थ सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने रविवारी श्री स्वामी समर्थ विद्यालयाच्या प्रगणांत आयोजित आरोग्य शिबीरात अध्यक्षीय भाषणात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी तालुका आरोग्यधिकारी डाँ.प्रांजली पाटील होत्या.
व्यासपीठावर ऍड.कृतिका आफ्रे,नगरसेविका अलका महाजन, वर्षा पाटील, डॉ.विद्या पारोचे, ग्रंथपाल सोनाली सोनार उपस्थित होते. तालुका आरोग्यअधिकारी डाँ.पाटील पुढे म्हणाल्या की, महिलांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. महिला अजरपणा बाबत लाजतात परिणामी छोट्या स्वरूपाचा आजार बळावतो म्हणून महिलांनी लाजरेपणा सोडून खुले पणाने ङोक्टरांशी संवाद साधला पाहिजे असे आव्हानही डाँ.प्रांजली पाटील यांनी केले.
‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी ‘हे’ करा कोरोनावर शासन चांगल्या प्रकारे काम करीत आहे. परंतु आपण देखील काळजी घेतली पाहिजे. त्यात वारंवार हात स्वच्छ धुवावे, अस्वच्छ हात नाकातोंडावर ठेवू नये, भाजीपाला, फळे धुवून खावेत.तसेच कच्चे मांस खावू नये अशी खबरदारी घेण्याचे आवाहन तालूका आरोग्यधिकारी डाँ.प्रांजली पाटील यांनी व्यक्त केले.
महिलांनी मुलांना महिलांचा आदर करणारे संस्कार करावे महिलांनी आपल्या मुलांवर लहानपणीपासून महिलांचे आदर करणारे संस्कार करावेत.मुलांना लहानपणी पासूनच महिलांचे आदर करणारे संस्कार घडले तर वासनांध नराधम निर्माण होणार नाहीत. परिणामी निर्भया, कोपर्डी, हिंगणघाट यासारखे महिला अत्याचाराचे प्रकरण घडणार नाहीत असा आशावाद व्यक्त करीत कायदा महिलांचा बाजूने मात्र कायद्याचा गैरफायदा घेवू नका कायद्याचा ढाल म्हणून वापर करा तलवार म्हणून नाही असे आवाहन अड.कृतिका आफ्रे यांनी केले.
त्यावेळी मनीषा टोळकर, सरिता टोळकर, अलका बिचवे, राधिका करोडपती,सारिका पाटील,गीता टोळकर, ज्योती हजारे,सुनीता लोहार,उज्वला पाटील,संगीता नागपुरे, माया पाटील,नूतन नागपुरे आदी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष विशाल महाजन यांनी प्रास्तविक केले.सूत्रसंचालन जीवन मोरे तर आभार वाचनालयाच्या ग्रंथपाल सोनाली सोनार यांनी मानले.
उत्कृष्ट सूत्रसंचालनाने कार्यक्रमात ‘रंगत’मनन बहुद्देशीय संस्था; श्री स्वामी समर्थ सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर घेण्यात आले. त्यात ११२ महिलांची हिमोग्लोबिन,थवायरेडची मोफत तपासणी करण्यात आली.दरम्यान कार्यक्रमात जीवन मोरे यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन करीत साऱ्यांचे लक्ष वेधून कार्यक्रमात रंगत आणली.