महाशिवरात्री महोत्सव : भाविकांनी घेतले बाहेरून ओकारेश्वराचे दर्शन (व्हिडिओ )

जळगाव, प्रतिनिधी । ओकारेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्ताने श्री महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, कोरोना महामारीमुळे भाविकांना मंदिरात न जाता बाहेरुनच दर्शन घ्यावे लागत असल्याने नाराजी पहावयास मिळाली.  

महाशिवरात्र मोहत्सव असला तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्यात आलेला नसून त्यांना बाहेरून मुख्यद्वारापासून दर्शन घ्यावे लागत आहे. दुपारी १२ वाजता अभिजित मुहूर्तावर १०८ निरांजन्याद्वारे महाआरती करण्यात आली. भाविकांना आरतीचा लाभ घेता यावा यासाठी ओकारेश्वर देवस्थान चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे स्क्रीनवर प्रक्षेपण करण्यात आले. भाविकांनी मंदिराच्या बाहेरूनच सोशल डिस्टन्सिंग राखत आरतीत सहभाग घेतला. मंदिर दर्शनासाठी पहाटे ४ वाजता उघडण्यात आले. ते उद्या शुक्रवार दि. १२ वाजेच्या दुपारी १२ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार असल्याचे  ओकारेश्वर देवस्थान चॅरीटेबल ट्रस्ट कळविण्यात आले आहे.

 

 

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/481821129858188

 

Protected Content