जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील महाविर नगरातील सत्यम अपार्टमेंट मधुन अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे लोखंडी ग्रिलचे दार उघडून देान मोबाईल लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरेाधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील महावीर नगरातील सत्यम अपार्टमेंट मध्ये सुनिल वामनराव इंगळे हे औषधविक्रेता असून ते पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास आहे. रविवार २० मार्च रोजी सुनिता इंगळे या नेहमीप्रमाणे सकाळी ६.३० वाजता मॉर्निक वॉकसाठी निघाल्या. घरातून जातांना त्यांनी घराचे दार आतून बंद करुन त्या निघाल्या. चोरट्यांनी त्यांचे घराचे दार उघडून अज्ञात चोरट्याने आत शिरत टिपॉयवर ठेवलेला एक व दुसरा दिवाणवर ठेवलेला असे दोन मोबाईल असा एकुण १८ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केले. सकाळी घर उघडे दिसल्यावर शेजारी राहणार्या महिलेने इंगळे यांना आरोळी मारुन तुमच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली. यावेळी सुनिल इंगळे यांनी झोपेतून उठून बघीतल्यावर घरातील दोघ मोबाईल चोरीला गेल्याचे त्यांना दिसून आले. तत्काळ त्यांनी शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली असून अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.