बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महावितरणच्या कर्मचार्यास मारहाण केल्या प्रकरणी आरोपीला कारावास सुनावण्यात आला आहे.
वीज वापर केल्यानंतर वीज वसुलीसाठी आलेल्या वसुली पथकावर नेहमीच जीवघेणे हल्ले होतात अनेक वेळा हे प्रकरण पोलिस स्टेशनला जातात पण त्यानंतर काही निष्पन्न होत नाही पण जेव्हा एखादा प्रकरण लावून धरल्या जाते तर त्यामध्ये हल्लेखोराला चक्क शिक्षा देखील होते असाच काहीचा प्रकार बुलढाण्यात न्यायालयाने निकाली काढला.
थकीत वीज देयकाच्या वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या पथकातील तंत्रज्ञास शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी बुलढाणा न्यायालयाने एकास दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. हा निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल खटी यांनी दिला. पाच वर्षांपूर्वी २१ नोव्हेंबर २०१७ मध्ये महावितरणचे तंत्रज्ञ संजय शंकर बावणे व त्यांच्या सहकारी आरती बावणे या बुलढाणा शहरातील मिलिंदनगर परिसरात थकबाकी वसुलीसाठी गेले होते. पूर्णाबाई दशरथ झिने यांच्याकडे थकीत सुमारे ७ हजार ३० रुपयांची थकबाकी भरण्याच्या मागण्यासाठी गेले असता पूर्णाबाई दशरथ झिने याने त्यांच्या अंगावर जाऊन त्यांना शिवीगाळ करून मारहाण करत दमदाटी केल्याची तक्रार बावणे यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात केली होती.
या प्रकरणी पोलिसांनी तपास करून न्यायालयात प्रकरण सुनावणीसाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल खटी यांच्यासमोर आले. सदर प्रकरणात न्यायालयाने कारावासाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले.
वीज ग्राहकांकरता की जे बील अमाप वापरतात जेव्हा बिल भरणे डोळीजड होते तेव्हा वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्यांना शिवीगाळ, मारहाण सारखे हत्यार उपसतात. पण आता या निकालामुळे महावितरणच्या वीज वसुली पथकावर हात उगारणेआधी निश्चित विचार करावा लागेल .असा काहीसा या निर्णयावर म्हटल्यास वावग ठरणार नाही… विज बिल भरा नाही तर होऊ शकते जेलवारी…