मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | भाजपाने तिसऱ्या जागेसाठी उमेदवार दिला तरी काही फरक पडणार नाही, महाविकास आघाडीच्या पाठींब्यामुळे शिवसेनेचे दोन्ही जागा विजयी होणार असे खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे.
कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आणि खा. संजय राऊत यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे नेते मंत्री बाळासाहेब थोरात तसेच सेनेचे सगळे मंत्री, मविआचे प्रमुख नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल हे ३१ मे रोजी नामांकन भरतील तर, कॉंग्रेस नेहमीप्रमाणे ऐनवेळी उमेद्वार जाहीर करून अर्ज दाखल करतील, शिवसेनेच्या उमेदवारांना संपूर्ण महाविकास आघाडीचा पाठिंबा असून राज्यसभेच्या सहा जागांपैकी मविआचे ४ उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचे खा. संजय राऊत यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
तसेच भाजपा केंद्रसरकारच्या माध्यमातून अशा कारवाया करून आणि तिसरा उमेदवार देत निवडणूक जिंकणार हे कदापि शक्य नाही, हा काळहि निघेल, नंतर आमचीच सूत्रे राहतील असेही खा. राऊत यांनी आज सकाळीच परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर कारवाई झाल्यानंतर भाजपला टोला दिला आहे.
महाविकास आघाडीच्या पाठींब्यामुळे विजय निश्चित – राऊत
2 years ago
No Comments