एरंडोल प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या एरंडोल तालुकाध्यक्षपदी सागर शेलार यांची नियुक्ती करण्यात आली. गुरूवारी झालेल्या पत्रकार बांधवांना हेल्मेट वाटप कार्यक्रमात त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे, पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही, जि.प.सदस्य प्रताप पाटील, प्रदेशाध्यक्ष श्री. मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार बांधवांची उपस्थिती होती. त्यांच्या निवडीबद्दल मानव अधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद चिलानेकर, उपाध्यक्ष ईश्वर महाजन, एरंडोल तालुका पत्रकार बांधव व मित्र परिवारातर्फे अभिनंदन करण्यात आले.