यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तिथीनुसार शिवजयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.
हिन्दवी स्वराज्याचे संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी प्रमाणे जयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित जिल्हा अध्यक्ष चेतव अढळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात पूजन यावल चे पोलीस उपनिरिक्षक प्रदीप बोरुडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास मराठी अस्मिता प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व पत्रकार डी बी पाटील, अय्युब पटेल, पत्रकार सुनिल गावडे उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष श्याम पवार, तालुकाध्यक्ष किशोर नन्नवरे, मनसेचे शहराध्यक्ष गौरव कोळी, कुणाल बारी, सचिन बारी, नितीन डांबरे, प्रतिष्ठानचे अँड देवेंद्र बाविस्कर प्रशांत कासार, अशोक पाटील ,गजेंद्र माळी, सुनील गावडे ,शिवाजी बारी, यावलचे समाजसेवक नितीन सोनार,बांधकाम अभियंता अनिल पाटील, अतुल बडगुजर यांच्या आदी मान्यवर मंडळी प्रामुख्याने उपस्थित राहुन छत्रपतींना त्यांच्या तिथिनुसार जन्मदिना निमित्त मानाचा मुजरा म्हणुन त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अपर्ण करीत अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवजयंतीचा कार्यक्रमास उपस्थित सर्व शिवप्रेमींचे आभार किशोर नन्नवरे यांनी मानले.