Home Uncategorized महाराष्ट्रात १३०० शाळा बंद करणाऱ्या तावडेंना आपल्या शाळा दाखवा : अरविंद केजरीवाल

महाराष्ट्रात १३०० शाळा बंद करणाऱ्या तावडेंना आपल्या शाळा दाखवा : अरविंद केजरीवाल


tawade and kejriwal
 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात १३०० सरकारी शाळा बंद करणारे शिक्षण मंत्री विनोद तावडे हे दिल्लीत भाजपाचा प्रचार करणार आहेत. त्यांना दिल्लीतील शाळा दाखवा, अशा शब्दात दिल्लीकरांना आवाहन करत तावडेंना केजरीवाल यांनी टोला लगावला आहे.

 

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात दररोज आरोप-प्रत्यारोंपाच्या फैरी झडत आहेत. सभा, प्रचार फेऱ्या, रोड शो करणाऱ्या नेत्यांनी सोशल मीडियावरूनही एकमेकांविरोधात आरोप करणे सुरूच ठेवले आहे. महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री आणि भाजप नेते विनोद तावडे दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत. यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जोरदार टीका केली आहे. दिल्लीत भाजपा उमेदवाराचा प्रचार करतानाच विनोद तावडे यांचे दोन फोटो केजरीवाल ट्विट केले आहेत. त्याचबरोबर “विनोद तावडे हे महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री आहेत. ज्यांनी राज्यातील १३०० सरकारी शाळा बंद केल्या. ते आता दिल्लीत भाजपाचा प्रचार करण्यासाठी आले आहेत. दिल्लीकरांनों, ‘आप’ने खूप मेहनत घेऊन सरकारी शाळा चांगल्या केल्या आहेत. त्यांना आपल्या शाळा दाखवा, छोले भटूरे खाऊ घाला आणि दिल्ली दाखवा. ते आपले अतिथी आहेत, अशी टीका केली आहे.


Protected Content

Play sound