मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात बुधवारी तब्बल ६ हजार ६०३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, १९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २ लाख २३ हजार ७२४ वर पोहचली आहे. यापैकी ९ हजार ४४८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १ लाख २३ हजार १९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
गुरुवारी ४,६३४ रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याने कोरोनामुक्तांचा एकूण आकडा १ लाख २३,१९२ वर गेला. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.०६ टक्क्यांवर पोहोचले आहे. आता राज्यात ९१,०६५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोना रुग्णांचा मृत्युदर ४.२२ टक्के झाला आहे. राज्यात आजवर ११ लाख ९१,५४९ जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी १८.७७% लोक पॉझिटिव्ह आले. ६ लाख ३८,७६२ लोक होम, तर ४७,०७२ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत.