महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या २००६ वर पोहचली !

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात आज (सोमवार) कोरोनाग्रस्तांची संख्या २००६ झाली आहे. रविवारी २२१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली, तर २२ रुग्णांचा मृत्यू झालाय.

 

राज्यभरातून आजतागायत पाठवण्यात आलेल्या नमुन्यांपैकी २ हजार ००६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. २२७ कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात सध्या ६१ हजार २४७ व्यक्ती घरी क्वॉरंटाइन असून ५ हजार ६४ संस्थांमध्ये क्वॉरंटाइन आहेत. राज्यात ४ हजार ८६४ सर्वेक्षण पथके रुग्णांच्या शोधार्थ कार्यरत असून त्यांनी आजपर्यंत १७ लाख ६४ हजार व्यक्तींची तपासणी केली आहे. दरम्यान, सध्या देशातील ७९८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १२ एप्रिलपर्यंत देशात १,८१,०२८ जणांच्या १,९५,७४८ नमुन्यांची चाचणी करण्यात आलीय. १२ एप्रिल रोजी एकाच दिवशी १५,५८३ नमुने तपासण्यात आले आहेत.

Protected Content