मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. गुरुवारी एका दिवसात राज्यात तब्बल ८८ नवे पॉझिटिव्ह अहवाल आल्याने कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ४२३ वर गेली आहे. गुरुवारी मुंबईत दोन, तर पुणे व जळगावात प्रत्येकी एका रुग्णाचा असं राज्यात आतापर्यंत एकूण २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली आहे.राज्यात गुरुवारी एकूण ६४८ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १० हजार ८७३ नमुन्यांपैकी १० हजार २८० जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ४२ करोना बाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३८ हजार२४४ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून २१३८ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. २ जण बरे होऊ घरी परतले आहेत. गुरुवारी मुंबई व परिसरात सर्वाधिक म्हणजे ६३ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी मुंबईत ५४, पुण्यात ११, अहमदनगरमध्ये ९, औरंगाबाद २, तर सातारा, उस्मानाबाद, बुलडाणा आणि हिंगोलीतही प्रत्येकी एक नवीन रुग्ण आढळला आहे.