Home आरोग्य महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशमध्ये पोहोचलेल्या सात कामगारांना कोरोनाची लागण

महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशमध्ये पोहोचलेल्या सात कामगारांना कोरोनाची लागण


लखनौ (वृत्तसंस्था) महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशमध्ये पोहोचलेल्या कामगारांपैकी सात जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती बस्तीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

लॉकडाउन दोन आठवड्यांनी वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने शुक्रवारी घेतला. हा निर्णय घेण्यापूर्वी कामगारांना परत नेण्याच्या मागणीनुसार राज्यांनी विविध ठिकाणी अडकलेले आपापल्या कामगार, विद्यार्थ्यांसह नागरिकांना परत नेण्याचे काम सुरू केले होते. उत्तर प्रदेश सरकारने विविध राज्यात अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत नेण्यासाठी बस सोडल्या होत्या. उत्तर प्रदेश सरकारने महाराष्ट्रातून कामगारांना बसेसने घरी पोहोचवले होते. या कामगारांची तपासणी केल्यानंतर, यात सात जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हे कामगार झाशी मार्गे बस्ती जिल्ह्यात दाखल झाले होते.


Protected Content

Play sound