मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | भारतीय अर्थव्यवस्थेचे महाराष्ट्र इंजिन असून लवकरच महाराष्ट्राची ७ ट्रिलियनची अर्थव्यवस्था होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन आहे. एक राष्ट्र म्हणून आपण प्रगती करत राहिलो, तर आपण लवकरच ७ ट्रिलीयन अर्थव्यवस्था होऊ शकतो, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच आम्ही २०१५ मध्ये २०३० पर्यंत ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्था बनण्याचा संकल्प केला होता. तो संकल्प आम्ही पुढे नेणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वसमावेशक पायाभूत सुविधा, नावीन्य आणि तंत्रज्ञान यांचा मेळ घालणारे मॉडेल घेऊन येत असल्याचे स्पष्ट केले. यासोबत राज्यातील पायाभूत सुविधांसाठी अनेक प्रकल्प सुरू केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.