Home Cities जळगाव महामार्गावरील खड्डे बूजविण्यासाठी उद्या प्रतिकात्मक ‘निषेध’ आंदोलन

महामार्गावरील खड्डे बूजविण्यासाठी उद्या प्रतिकात्मक ‘निषेध’ आंदोलन

0
33


andolan


जळगाव, प्रतिनिधी |
महामार्गावर झालेल्या जीवघेण्या खड्यांना बुजावण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जळगाव यांना वारंवार पत्र देऊनही महामार्गाच्या खड्यांना बुजविले नसल्याने नशिराबाद येथील ग्रामस्थ उद्या (दि. ६) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक स्वरुपात दहाव्याचा व उत्तरकार्याचा कार्यक्रम करणार आहेत.

राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या जीवघेण्या खड्यांना बुजावण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जळगाव यांना नशिराबादच्या ग्रामस्थांनी  वारंवार पत्र देऊनही महामार्गाच्या खड्यांना बुजविण्यात आले नाही. मृतावस्थेगत वागणाऱ्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागामुळे बऱ्याच लोकांना महार्गावर जीव गमवावा लागत आहे. ‘न्हाई’ मृतावस्थागत झाल्यामुळे प्रतिकात्मकरित्या गांधीगिरी मार्गाने आंदोलन सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या प्रतिकात्मक दहाव्याचा व उत्तरकार्याचा कार्यक्रम निमित्त गांधीगिरी पध्दतीने १०० लोकांना अन्नदान करण्यात येणार आहे  अशी माहिती माजी सरपंच पंकज महाजन यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound