महापौर महाजनांकडून ‘कोरोनायोद्ध्यां’चा सन्मान

 

 

 जळगाव : प्रतिनिधी ।  महापौर  जयश्री  महाजन आज  कामगार दिनाचे औचित्य साधत शहरातील कोरोनायोद्धे सफाई कामगार , डॉक्टर्स , वैद्यकीय कर्मचारी यांचा प्रातिनिधिक सत्कार करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली

 

प्रारंभी  शहरातील सुपरिचित गणपती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट देऊन तेथील कर्मचार्‍यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार महापौरांनी केला . याप्रसंगी संचालक डॉ. शीतल ओसवाल, ‘सीईओ’ तेजस जैन व संदीप भुतडा यांच्याशी चर्चा करून ‘कोविड-19’च्या संक्रमणकाळात अहोरात्र देत असलेल्या प्रामाणिक सेवेसह त्यांच्या स्वनिर्मित ऑक्सिजन प्लांट उभारणीबाबत समाधान व्यक्त केले.

 

‘वसंतस् दि सुपरशॉप’ला भेट देऊन तेथील कर्मचार्‍यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार महापौरांनी केला. याप्रसंगी संचालक नितीन रेदासनी यांनी व्यवसायासह सुपरशॉपनजीक होणारी वाहन पार्किंगची समस्या व त्यामुळे होणारी ग्राहकांची अडचण यासंदर्भात महापौर  जयश्री महाजन यांच्याशी  चर्चा केली.

 

.  त्यानंतर  मोटेल कोझी कॉटेजच्या पेट्रोलपंपाला भेट देऊन तेथील कर्मचार्‍यांचा सत्कार करून त्यांच्या सेवेविषयी  महापौरांनी चर्चा केली. यावेळी संचालक प्रकाश चौबे हे महापौर  जयश्री महाजन यांनी  कर्मचार्‍यांच्या केलेल्या सत्काराने भारावून  गेले होते  ‘माझ्या आयुष्यप्रवासात प्रथमच पेट्रोलपंपावरील कर्मचार्‍यांचा महापौरांकडून सत्कार व्हावा, ही बाब अतिशय संस्मरणीय आहे. आपल्याला मी मनापासून शुभेच्छांसह धन्यवाद देतो’ असे चौबे म्हणाले .

 

यानंतर  महापौरांनी  दि जळगाव पीपल्स बँक, रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट संचालित  राजर्षी  छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटलला भेट दिली व तेथील कर्मचार्‍यांना शुभेच्छा दिल्या. हॉस्पिटलमधील प्रसूती विभागात जाऊन तेथील महिलेची व तिच्या कन्येची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.जळगाव महानगरपालिकेच्या ‘कोविड-19’ लसीकरण केंद्रालाही भेट देऊन डॉ. राम रावलानींची भेट घेत त्यांचा सत्कार महापौरांनी केला . याप्रसंगी डॉ. रावलानी   म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांपासून मी रुग्णालयाच्या माध्यमातून जनसेवा करीत आहे. मात्र, आजचा दिवस माझ्यासाठी अन् या रुग्णालयासाठी ऐतिहासिक म्हणावा लागेल. त्याचे कारण स्वतः महापौर म्हणून तुम्ही दिलेली भेट  आणि प्रोत्साहन ’.

 

औद्योगिक वसाहतीतील कोगटा उद्योग समूहाच्या गोपाल दालमिललाही महापौरांनी भेट दिली. तेथील कर्मचार्‍यांचा सत्कार केला यावेळी नामदेव कोळपे हे कर्मचारी म्हणाले, ‘मी बर्‍याच दिवसांपासून दालमिलमध्ये कार्यरत आहे. परंतु महापौर यांच्या  हातून माझा सत्कार होतो, ही गोष्ट माझ्यासाठी अवर्णनीय आहे’. याप्रसंगी संचालक प्रेम  कोगटा, अनुप कोगटा, अतुल कोगटा व त्यांच्या सहकार्‍यांनीही महापौर    महाजन यांचा  सत्कार केला. प्रेम कोगटा यांनी ‘औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना महापालिकेकडून वर्षानुवर्षांपासून मिळणारी सापत्नभावाची वागणूक थांबवून आतातरी सहकार्याचा हात मिळायला हवा. औद्योगिक वसाहतीतील खुल्या भूखंडांवर महापालिकेच्या माध्यमातून चांगले प्रोजेक्ट करता आले, तर त्यासाठी आम्हीही निश्चितपणे सहकार्य करू, असे सांगत  आश्वस्त केले.

Protected Content