महापौरांच्या हस्ते प्रभाग क्र. १२ च्या विविध विकास कामांचे उद्घाटन (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांतून शहर विकासासाठी मिळालेल्या निधीतून प्रभाग क्रमांक १२ मधील रामदास कॉलनी , वर्धमान नगर, विद्यानगर या परिसरात विविध विकास कामांचा शुभारंभ महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आला.

 

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून शहर विकासासाठी दिलेल्या निधीतून प्रभाग क्र. १२ मध्ये विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. याविकास कामांचा शुभारंभ महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. यात ७० लाख ५८ हजार रुपयांचे रस्ते डांबरीकरण करण्यात येणार आहे. तसेच ३३ लाख रुपयांचे आरसीसी गटारी तयार करण्यात येणार आहे. या प्रभागात जवळपास २ कोटींच्या विकास कामांचे उद्घाटन आज करण्यात आले. प्रभागातील विकास कामे निधी अभावी खोळंबली होती ती आता मार्गी लागतील अशी आशा महापौर जयश्री महाजन यांनी व्यक्त केली. तर उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी यावेळी सांगिलते की, मागील काळात प्रभाग क्र. १२ मधील रस्त्यांच्या कामांचे उद्घाटन ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होवून त्यांचे लोकार्पण झाले होते. दरम्यान उर्वरित कामे पावसाळ्याच्या पूर्वी पूर्ण करून ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते त्यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. स्थानिक नगरसेवक बंटी जोशी यांनी सांगितले की, शहराच्या विकासासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी ६० कोटींचा निधी दिला आहे. यापैकी १० ते १२ कोटींचा निधी प्रभाग क्र. १२ साठी मिळाला आहे. दरम्यान, माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी सांगितले की, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून साधारणतः ६१ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यातील भरमसाठ निधी प्रभाग क्र. १२ ला देण्यात आला होता. स्थानिक नगरसेवक नितीन बरडे व बंटी जोशी यांनी याभागातील नागरिकांची अद्यावत उद्यानाची मागणीनुसार २५ कोटींच्या शिल्लक निधीतून ८३ लाख रुपयांच्या कंपाऊंड वाॅलच्या कामाचे शुभारंभ झाला आहे. महिन्याभरात या कंपाऊंड वाॅलचे काम पूर्ण होणार आहे. पीपल्स बँकेच्या माध्यमातून एक सुंदर उद्यान येथे तयार करण्यात येणार आहे. नाल्याचा ६३ लाख रुपयांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे. तर वर्षभरात या प्रभागातील प्रलंबित विकास करण्यात येईल अशी ग्वाही श्री. लढ्ढा यांनी यावेळी दिली. प्रभाग क्र. १२ मधील विविध विकास कामांच्या शुभारंभप्रसंगी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी महापौर ललित कोल्हे, नगरसेवक नितीन बरडे, नगरसेवक बंटी जोशी, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, सविता माळी-कोल्हे यांच्यासह आदी उपस्थित होते.

भाग १
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/427407639122383

भाग २
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/302045735319231

Protected Content