पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारत भूमीत सर्वच जातींमध्ये संत महापुरुष होऊन गेलेत. या महापुरुषांच्या विचारांमध्ये विश्वकल्याणाचे सामर्थ्य असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ स्वयंसेवक हेमंत जोशी यांनी केले.
पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत येथे शनिवारी भगवान परशुराम आणि महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. प्रारंभी भगवान परशुराम व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा, माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, जेष्ठ पत्रकार शांताराम लाठे, पत्रकार मनोज जोशी, अॅड. संजय पाटील, विश्वनाथ वानखेडे आदींनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन रामेश्वर पाटील यांनी केले. आभार पत्रकार शरद बेलपत्रे यांनी मानले. यावेळी सरपंच नीता पाटील, बाबुराव घोंगडे, श्याम सावळे, अरूण घोलप, राजू जाधव, रवींद्र मोरे, अरुण घोलप, समाधान पाटील, आर. बी. पाटील, वासुदेव घोंगडे, रमेश माहोरे, योगेश जोशी, विजय माहोरे, नागेश साखरे, प्रदीप साखरे, मनोज लाठे, मोहना जोशी, राहूल घरोटे यांच्यासह पत्रकार, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य , समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.