जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महापालिकेतर्फे शहरात कॅरीबॅग बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी सुरु केली आहे. या कारवाईत प्रतिबंधित प्लास्टिकबाबत व्यापाऱ्यांना माहिती नसल्याचे व्यावसायिक व मनपा कर्मचारी यांच्यात वाद उद्भवत होते. या प्रतिबंधित प्लास्टिकबाबत व्यावसायिकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता मनपात बैठकीचे आयोजन करण्यात आले.
शहरात प्लास्टिक कारवाई दरम्यान मनपा कर्मचारी व व्यापाऱ्यांमध्ये वाद होणे नित्याचे झाले होते. हा वाद पुन्हा पुन्हा उद्भवू नये यासाठी काही व्यापाऱ्यांनी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची भेट घेऊन मार्गदर्शन मागितले. यापार्श्वभूमीवर शहरात प्रतिबंधित प्लास्टिक उत्पादक व्यावसायिक, किरकोळ कॅरीबॅग यांना शासनाच्या प्लास्टिक बंदी नियमांची सविस्तर माहिती व्हावी याकरिता मनपाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात व्यावसायिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत शासनाच्या प्लास्टिक अधिनियमाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित व्यापाऱ्यांच्या शंकाचे समाधान करण्यात आले. या बैठकीत आयुक्त डॉ. विद्या गायकवाड. प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी श्री. चव्हाण, श्री. ठाकरे तसेच अतिक्रमण अधिक्षक संजय ठाकुर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी आरोग्य अधीक्षक यु. आ. इंगळे, एल. बी. धांडे, एन. इ. लोखंडे, निरीक्षक जे. के. किरंगे आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1156643958238397