महानगर शिवसेनेतर्फे कोरोना योद्धयांना विमा कवच

 

जळगाव : प्रतिनिधी ।  शिवसेना जळगाव महानगरतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 161 कोरोना योद्ध्यांना1 वर्षाचे विमा संरक्षण देण्यात येणार असून वितरण पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

 

वर्षभरापासून अनेक रुग्णवाहिकाचालक ,  खाजगी सुरक्षा रक्षक , सफाई कर्मचारी व कोरोना काळात ज्यांनी योगदान दिले  अशा  161 कोरोना  योद्ध्यांना 1 वर्षाचे विमा संरक्षण (रुपये 1 लक्ष) देण्यात येणार आहे

 

या विमा पॉलिसीचे वितरण पालकमंत्री ना गुलाबराव  पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ , माजी आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे , जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे , माजी महापौर नितिन लढ्ढा , महापौर जयश्री महाजन ,  महानगर प्रमुख शरद तायडे , सुरेश चौधरी ( माजी नगराध्यक्ष धरणगाव) , विरोधी पक्षनेते सुनील महाजन उपस्थित राहणार आहेत  उपस्थितीचे आवाहन उपमहानगर प्रमुख प्रशांत  सुरळकर यांनी केले आहे

31 जुलैरोजी हे विमा पॉलिसी वितरण  तरुण कुढापा चौक , नेरी नाका   येथे करण्यात येणार आहे असे संयोजकांनी सांगितले

 

 

Protected Content